नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय डाक विभागातर्फे फ्रांचाईजी आउटलेट उघडण्याबाबतचे अर्ज सर्व डाक कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ३१ जानेवारी २०२४ पर्यंत प्रवर अधीक्षक, डाकघर नाशिक येथे जमा करावेत असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पोस्टल फ्रांचाईजी आउटलेट संदर्भात अधिक माहितीसाठी 0253-2506645 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रवर अधीक्षक डाकघर, नाशिक विभाग कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असेही प्रवर अधीक्षक, डाकघर नाशिक विभाग यांनी कळविले आहे.