नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बॅक्वेट हॉल मध्ये विवाह सोहळया निमित्त गेलेल्या व-हाडी महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली.. या पर्समध्ये रोकडसह मोबाईल आणि चांदीचे दागिणे असा सुमारे ४० हजाराचा ऐवज होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघा रमेश भालेराव (रा.जोरेमळा,नायरा पेट्रोल पंपामागे दिंडोरीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भालेराव गेल्या सोमवारी (दि.२२) विवाह सोहळयानिमित्त औरंगाबादरोडवरील लक्ष्मी बॅक्वेट हॉल येथे गेल्या असता ही घटना घडली. वधू वरांच्या स्टेजजवळ त्या अन्य नातेवाईक महिलांसोबत गप्पा गोष्टी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरून नेली.
या पर्स मध्ये रोकडसह मोबाईल व चांदीचे दागिणे असा सुमारे ३८ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज होता. दरम्यान ही घटना हॉल मधील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.