नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे दर सातत्याने कोसळू लागले आहे. मागील काही दिवसांपूर्वी १६००-१८०० रुपये असणाऱ्या सरासरी दर कमी होऊन तो ९०० ते १००० रुपयांवर आला आहे.
हे भाव कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. त्यांनी लिलाव बंद पाडून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.