नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर पाडळी जवळ कंटेनर व कारच्या अपघातात पाच जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता नाशिककडून मुंबईला जाणारी कंटेनर व कारची जोरदार धडक झाली.
या अपघातात बदलापुर येथील अतुल विजय वर्मा (४२) दीपिका अतुल वर्मा (४३) अरेंद्र विजय वर्मा, आरती अरेंद्र वर्मा, तन्वी अरेंद्र वर्मा, अनित अतुल वर्मा, वेदांत अरेंद्र वर्मा हे जखमी झाले आहे. अपघातातील वाहन कंटेनरचा नंबर क्रं.NL.01.AG.8416 कार क्रं.MH.04.KL.1870 हा आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व या जखमींना तात्काळ वाडीव-हे खासगी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.