इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. या टर्ममध्ये तिस-यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे सम्राट चौधरी व विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. हे नेते शपथ घेत असतांना जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांच्याबरोबर आठ मंत्र्यांनी शपथ घेतली.
या सोहळयाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थितीत होते. नितीशकुमार यांनी सकाळी राजीनामा देत लालु प्रसाद व इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज भाजपची बैठक झाली. त्यात नितीशकुमार बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला.
संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस युती तुटल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार हे पुन्हा ‘एनडीए’मध्ये सामील झाले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. त्यापैकी १७ जागांवर भाजपचे खासदार आहेत, तर संयुक्त जनता दलाचे १६ खासदार खासदार आहेत. नितीशकुमार यांनी भाजपसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. सध्या बिहार विधानसभेत संयुक्त जनता दलाचे ४५, राष्ट्रीय जनता दलाचे ७९, भाजपचे ७८, काँग्रेसचे १९ सीपीआय (एम-एल) १२, सीपीआय (एम) आणि सीपीआय प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आणि ‘एआयएमआयएम’ चा एक आमदार आहे, तर एक अपक्ष आमदार आहे.