नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील शिवशक्ती चौक भागात राहणा-या २४ वर्षीय परप्रांतीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोमल अजितसिंग कश्यप (रा.सरस्वती चौक,शाहूनगर) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. कोमल कश्यप यांनी शनिवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात खिडकीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता.
त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत सतिश कश्यप यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.