नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिचीतानेच दमदाटी करीत महिलेस फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ४० लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे विनयभंग आणि अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले
पीडितेचा परिचीत असलेल्या अभिजीत नरेंद्र अहिरे याने ओळखीचा फायदा उचलत महिलेचा पाठलाग करून विनयभंग केला. हा प्रकार जून २००७ ते २००८ दरम्यान घडला. यानंतर त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत महिलेस फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून तब्बल ४० लाख रूपयांची खंडणी उकळली.
ही रक्कम ऑनलाईन व रोख स्वरूपात स्विकारण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे विनयभंग आणि अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास पोलीस नाईक गोडे व उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.