नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमाच्या जाळय़ात अडकवून तरूणीवर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेस २०१७ मध्ये संशयित अनिकेत रामदास भदाणे (२६ रा.गंगापूररोड) या युवकाने प्रेमाच्या जाळयात अडकविले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयिताने मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर त्याने गंगापूररोड व पुणे येथील हिंजवडी भागात वेळोवेळी घेवून जात युवतीवर बळजबरीने बलात्कार केला.
पण, या प्रकाराला युवतीने त्यास विरोध केला असता संशयिताने तिला शिवागीळ करीत तसेच अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याने भेदरलेल्या युवतीने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक पाटील करीत आहेत.