पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोलापुरातील माजी आमदाराच्या पुत्राने विवाहाचे आमिष दाखवत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार करण्यात केला आहे. विराज रविकांत पाटील असे त्याचे नाव आहे. विराजने डोक्याला पिस्तूल लावून धमकावत हा बलात्कार केला असल्याचे या अभिनेत्रींने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराज पाटील याने या अभिनेत्रीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचा आग्रह तिने धरताच तो या अभिनेत्रीला टाळू लागला. मला घरच्यांना का भेटवत नाही, अशी विचारणा पीडित अभिनेत्रीने केल्यानंतर विराजने शिवीगाळ केली. तिच्या डोक्याला पिस्तूल लावून तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू पोलिसांकडे गेली, तर मी कोण आहे, तुला दाखवतोच अशी धमकी त्याने दिली.
२७ ऑगस्ट ते वीस जानेवारी या कालावधीत विमाननगर तसेच मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये या अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आले. पीडित तरुणी मॉडेल आहे. तिने मराठी चित्रपटात काम केले असले, तरी अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘सोशल मीडिया’तून तिची आणि विराज पाटीलची ओळख झाली. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे त्याने दाखवले होते.