इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयाबद्दल टेनिसपटू रोहन बोपण्णा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ४३व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. मॅथ्यू एब्डेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरले. द्वितीय मानांकित रोहन-मॅथ्यू जोडीने बिगरमानांकित सिमोन बोलेली आणि आंद्रेआ वावासोरीवर ७-६ (७-०), ७-५ असा विजय मिळवला.
काही दिवसांपूर्वीच दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलले. या जोडीचं हे पहिलंच जेतेपद आहे. पुरुष दुहेरी प्रकारात रोहनचं हे पहिलंच जेतेपद आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
वयाची कोणतीही अडचण नसते ! हे विलक्षण प्रतिभावान रोहन बोपण्णा याने वेळोवेळी दाखवून दिले आहे.ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्याचे अभिनंदन. आपले धैर्य, कठोर परिश्रम आणि चिकाटीच आपल्या क्षमतांना परिभाषित करते, याचे सुंदर स्मरण करून देणारा त्याचा हा प्रवास उल्लेखनीय आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.”