इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर मंत्री छगन भुजबळ नाराज असले तरी त्यांची राष्ट्रवादीत कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भूमिकेबाबत हात झटकले आहे. भुजबळांनी या अध्यादेशावर विचार विनिमयासाठी तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफ्फुल पटेल यांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगत त्यांना एकटे पाडले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भुजबळ काहीही बोलत असतात, असे सांगून त्यांच्या भूमिकेवरुन हात झटकले आहे.
पटेल म्हणाले, की भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून आपली मांडत असतात. त्यांची भूमिका ही समता परिषदेची असते. भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. कुणबी ओबीसीच असल्यामुळे भुजबळ यांनी माझ्याशी चर्चा करताना कधी विरोध केला नाही. मराठा समाजातील कुणबींची संख्या वाढत असल्याने त्यांच्या मनात भीती आहे.
मराठा समाजाच्या सगेसोयरेचा अध्यादेश न टिकण्याच्या चर्चेबाबत पटेल यांना छेडता म्हणाले, की मी भविष्यवाणी करू शकत नाही; पण मराठा आरक्षणाच्या संबंधित क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणे योग्य नाही.