इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना न्यूयॉर्कच्या न्यायालयाने ८ कोटी ३३ लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. वृत्तपत्र स्तंभ-लेखिका ई. जीन कॅरोल यांची बदनामी केल्याबद्दल न्यायालयाने निर्णय दिला आहे.
ट्रंप यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप ई. जीन कॅरोल यांनी एका लेखात केला होता. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रंप यांनी हा आरोप फेटाळला होता. कॅरोल यांनी केवळ स्वतःच्या लेखनाचा खप वाढावा या हेतूने खोडसाळ लिखाण केल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला होता.
कॅरोल यांच्या बदनामीसाठी तसंच लैंगिक शोषणासाठी ट्रंप यांना न्यायालयाने दोषी ठरवले. आणि नुकसानभरपाई म्हणून एक कोटी ८३ लाख डॉलर्स आणि दंड म्हणून ६ कोटी ५० लाख डॉलर्स भरण्याचा आदेश दिला.