इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहे.
त्यात मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल, लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !
मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेबाबत अनेक प्रश्न व शंका उपस्थितीत केले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुध्दा हे ट्विट करत प्रश्न उपस्थितीत केले आहे.