नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज पहाटेच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रोडवर रामवाडी शिवारात इंदुरहून पुण्याला जाणा-या खाजगी ट्रॅव्हल्स गाडीचा पाठी मागील टायर फुटल्याने चालत्या बसने पेट घेतला. वाहन चालकाने वेळीच बस थांबत बस मध्ये असलेल्या ४० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
या बसने पेट घेतलेला असल्याने बस मधील जे पार्सल होते ते बससह जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव येथून अग्निशामक घटनास्थळी पोहचले. मात्र त्या अगोदरच बस संपूर्ण पणे जळून खाक झाले. सुदैवाने यात कुणालाही काही इजा झाली नसली तरी बस मधिल प्रवाशांच्या सामानाचे आणि बसचे मोठे नुकसान झाले आहे.