नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यानी सुमारे पावणे तीन लाखाच्या ऐवज लंपास केला. त्यात दोन भरदिवसा झालेल्या घरफोड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा, सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घरफोडी लहवित ता.जि.नाशिक येथे घडली. अंबड गावठाण भागात राहणाºया सचिन रामकृष्ण शिंगोटे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंगोटे परिवार गुरूवारी (दि.२५) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ५२ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाचोरे करीत आहेत.
दुस-या घटनेत रविवार कारंजा भागातील संदिप शिवाजी कोरडे (रा.ग्यानू पागा लेन,एकमुखा दत्त मंदिरजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोरडे कुटुंबिय २२ ते २६ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व घड्याळ असा सुमारे २१ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील केवल पार्क मार्गावर घडली. याबाबत ओमकार विनायकराव कुलकर्णी (रा.जाधव पार्क,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.१६) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडून कपाटातील सुमारे ९५ हजाराचे अलंकार चोरून नेले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.