इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – इंडिया आघाडीला एका मागून एक धक्के बसत आहे. पहिले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने स्वबळावर निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर बिहारमध्ये इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देत नितीशकुमारने पुन्हा पलटी मारली आहे. ते भाजपसोबत जाणार आहे. तर तिसरीकीकडे उत्तर प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवने परस्पर ११ जागा काँग्रेसला देत असल्याचे जाहीर करुन धक्का दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत अगोदरच बिघाड झाला आहे.
अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काँग्रेससोबतच्या आमच्या सौहार्दपूर्ण युतीची ११ भक्कम जागांसह चांगली सुरुवात झाली आहे. हा कल विजयी समीकरणासह पुढे जाईल. ‘भारत’ची टीम आणि ‘पीडीए’ची रणनीती इतिहास बदलेल.
हे ट्विट आल्यानतंर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. ८० लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अगोदर काँग्रेसने ४० जगा मागितल्या. त्यानंतर २० जागेची मागणी केली. त्यानंतर अखिलेश यादवने थेट ११ जागा जाहीर करत धक्का दिला. आता या जागेवाटपात दोन्ही पक्षात नेमंक काय घडतं हे बघावे लागणार आहे.