इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ नवा अध्यादेश जरांगे यांच्या भेटीला निघाले आहे. या नव्या अध्यादेशाचा तपशील बाहेर आलेला नाही. या अध्यादेशात जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीचा विचार करण्यात आल्याचे समजते.
राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय डॉ. मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शिंदे यांचा निरोप घेऊन चिवटे जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत. चिवटे यांच्यासमवोत विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे आणि आणखी दोघांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण जरांगे यांची विनंती सरकारने मान्य केली आहे. सग्या सोयऱ्याचा मुद्दा अध्यादेशात झाल्याची माहिती आहे. हाच चिवटे आणि भांगे हे जरांगे यांना ते जिथे असतील तिथे पोचवणार आहेत.