इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असून मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला आळेफाटा येथे काळे झेंडे दाखवले.
अजितदादांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याबद्दल मराठा समाजात संताप असून, संतप्त कार्यकर्त्यांनी हे झेंडे दाखवले. जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अजितदादांनी हा दौरा रद्द करावा, अशी मराठा समाजाची मागणी होती; परंतु मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून पवार दौऱ्यावर आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असताना काहीजण मात्र टोकाचे बोलत आहेत. मुंबईत येण्याची त्यांची भाषा आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करू, असा इशारा अजितदादांनी दिला होता.