रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात दोन महिन्यात १ हजार ८९३ नादुरुस्त रोहीत्रे तात्काळ बदलले

by India Darpan
जानेवारी 25, 2024 | 7:44 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्युत रोहित्र जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मोहीम सुरू केली, त्यानुसार ग्राहकांनी दिलेल्या माहितीची तात्काळ दखल घेत नाशिक जिल्ह्यात माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मध्ये १ हजार ८९३ इतके नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलण्यात आली असून तसेच नाशिक जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून रोहित्रासाठी प्राप्त झालेल्या निधीमधून १६३ रोहित्रे यंत्रणेत समाविष्ट झाली आहेत.

रोहित्र जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून रोहित्रासाठी ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. याचा आढावा सुध्दा दररोज घेण्यात येतो. या महावितरणच्या मोहिमेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात मागील माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या दोन महिन्यात मालेगाव मंडळात ९०० तर नाशिक मंडळात ९९३ अशी एकूण नाशिक जिल्ह्यात १ हजार ८९३ इतकी रोहित्रे बदलण्यात आली आहेत. महावितरणला रोहित्र बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात रोहित्र बदलण्यात येत आहे. तथापि, रोहित्र जळाले आहे, हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी.

रोहित्र जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची खबर १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडळ स्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी. नाशिक मंडळातील वीज ग्राहकांना नाशिक मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६६०२० या क्रमांकावर तसेच मालेगाव मंडळातील वीज ग्राहकांना मालेगाव मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ९०२९११६०१२ या क्रमांकावर खबर देता येईल. त्यासोबत याच क्रमांकाच्या व्हॉट्स अप नंबरवर जळालेल्या रोहित्राचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील सुद्धा संबंधिताना कळवता येईल.
तसेच जिल्ह्यातील शाळांना विजेचा व्यवसायिक दर न लावता नियमानुसार सार्वजनिक सेवा या वर्गवारीनुसार वीज बिलाची आकारणी करण्यात येते. मात्र या संदर्भात कुठलीही तक्रार वा शंका असल्यास संबधित महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. महावितरणच्या तात्काळ दुरुस्तीच्या या मोहीमेस वीज ग्राहकांनी सहकार्य करावे आणि रोहित्र बिघडल्याची खबर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जम्मूमध्ये १०० पूर्ण वातानुकूलित ई-बस सेवेचा शुभारंभ

Next Post

नाशिकच्या या पोलिस अधिकारी व अमंलदारांना राष्ट्रपती पदक

Next Post
Screenshot 20240125 195445 WhatsApp

नाशिकच्या या पोलिस अधिकारी व अमंलदारांना राष्ट्रपती पदक

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011