रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

५२ दिवसांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपात तोडगा

by India Darpan
जानेवारी 25, 2024 | 7:32 pm
in राज्य
0
Mantralay

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची सचिव, महिला व बालविकास, अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य आधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली.

१) शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले. तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
२) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केलें.
३) मोबाइल तात्काळ देणार.
४) मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार.
५) संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार. असे मान्य केले
६) संप काळ करोना काळातील राहिलेल्या दिवाळी व उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.
७) १०वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

वरील सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृती समितीला ही चर्चा आशा दायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्या नंतर त्याचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.
वरील परिस्थिती व शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृति समिती आपला संप मागे घेत आहे. आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, ॲड आरमायटी इराणी, ॲड. माधुरी क्षीरसागर हे कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटणार…अजित पवार यांनी दिले हे आश्वासन

Next Post

जम्मूमध्ये १०० पूर्ण वातानुकूलित ई-बस सेवेचा शुभारंभ

Next Post
image003EMH7

जम्मूमध्ये १०० पूर्ण वातानुकूलित ई-बस सेवेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011