नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अज्ञात समाजकंटकांनी घरासमोर उभ्या असलेल्या अॅटोरिक्षासह एक अॅक्टीव्हा दुचाकी पेटवून दिली. पंचवटीतील हिरावाडी भागात बुधवारी रात्री ही घटनाा घडली. यात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश राजू कानडे (रा.जोशीवाडा,मारूती मंदिरामागे,हिरावाडी) या रिक्षाचालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कानडे यांची अॅटोरिक्षा बुधवारी (दि.२४) रात्री त्यांच्या इमारतीच्या बाजूला पार्क केलेला असतांना ही घटना घडली.
अज्ञात समाजकंटकाने आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने अॅटोरिक्षासह जवळ लावेल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर ज्वलनशिल पदार्थ टाकून दोन्ही वाहने पेटवून दिले. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.