नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठक्कर बाजार बसस्थानकात वृध्द महिलेच्या पिशवीतील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. बाहेरगावी जाण्यासाठी पती समवेत बस स्थानाकवार आल्यानंतर ही घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविणकुमार काशिनाथ पिळोदेकर (रा.६५ रा.मारीगोल्ड पार्क,कर्मयोगीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पिळोदकर दांम्पत्य बाहेरगावी जाण्यासाठी रविवारी (दि.२१) ठक्कर बाजार बसस्थानकात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते बसची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली.
प्लॅटफार्म वरील आसनावर बसलेल्या यांच्या पत्नीचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील मंगळसूत्र ठेवलेली डबी चोरून नेली. या डबीत सुमारे एक लाख १७ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.