मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या मालेगाव मधील चंदनपुरी येथील खंडोबा महाराज यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन आरती करण्यात आली.
या पूजे अगोदर मानकरी यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुखवट्यांची पालखी वाजत गाजत भांडाऱ्याची उधळण करीत मंदिरात नेण्यात आली, यावेळी दादा भुसे, भाजपचे जिल्हा नेते सुरेश निकम यांच्या हस्ते तळी भरण्यात आली तर पहिल्याच दिवशी हजारोभविकानी दर्शनाला गर्दी झाली होती.