इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात एका महिलेकडून बुटची लेस बांधून घेणे प्रातांधिका-याच्या अंगलट आले आहे. या घटनेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. या कृतीचाही सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॅा. मोहन यादव यांनी थेट या प्रातांधिका-याला हटवण्याचे आदेश दिले. त्यांना निलंबित केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री यादव यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, सिंगरौली जिल्ह्य़ातील चित्रांगी येथे एसडीएमने एका महिलेला चपला बांधल्याचे प्रकरण समोर आले आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. या घटनेबाबत एसडीएमला तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या सरकारमध्ये महिलांचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.
चितरंगीच्या एसडीएम असवान राम चिरावन आहे. याअगोदर मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांच्या वागणूकीवर सक्त कारवाई केली आहे. त्यात ड्रायव्हरला औकात विचारणा-या जिल्हाधिकारी व शेतक-यांचा उर्मट बोलणा-या तहसिलदारावर त्यांनी कारवाई केली आहे. आता एसडीएमचा नंबर लागला आहे.