नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये विनापरवानगी मोर्चा, आंदोलन, निदर्शने करण्यास ८ फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलन, राजकीय पक्षांच्या आमदार फूट प्रकरणी न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
नाशिक शहरात जनतेच्या विविध मागण्यासाठी, राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, कामगार व व्यापारी संघटना हया मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषणे सारखे आंदोलने तसेच धार्मिक संणांचे आयोजन करतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांचे पाश्र्वभूमीवर त्याच्या प्रतिक्रिया नाशिक शहरात लवकर उमटत असतात. तसेच सध्या देशात, महाराष्ट्र राज्य व नाशिक शहरात खालील प्रमाणे परिस्थिती आहे.
१) महाराष्ट्र राज्यात विविध पक्षामध्ये फुट पडुन विरोधक व सत्ताधारी यांचेत फुट पडल्याने विविध पक्षाचे
कार्यकर्ते निषेध व समर्थन करीत आहेत.
२) विविध व वेगवेगळ्या प्रकरणावरून जनमानसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) मराठा, धनगर व ओबीसी आरक्षणाचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी आंदोलने चालु आहेत.
४) दिनांक २६/०१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिन आहे.
५) मकरसंक्रांती निमित्ताने शहरात ठिकठिकाणी पंतग उडविल्या जातात. त्यातुन अपघात होत आहे. तसेच वन्य पक्षी, प्राणी, व मानवी जिवीतास धोका निर्माण होत आहे.
वरील ५ ही परिस्थितीच्या अनुषंगाने वरिल घटनांचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोणातून महाराष्ट पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक शहर कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.