मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार रोहित पवार यांची बुधवारी ईडीने १२ तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी त्यांना ईडीने बोलावले आहे. रोहित पवार काल सकाळी ‘ईडी’ कार्यालयात सकाळी दाखल झाले. त्यावेळी समर्थनात शरद पवार गटाने शक्तिप्रदर्शन केले. चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबले. तर खासदार सुप्रिया सुळे या त्यांना ‘ईडी’ कार्यालयापर्यंत सोडायला गेल्या. होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ‘ईडी’चे कार्यालय आहे. या ठिकाणी त्यांची १२ तास आज चौकशी झाली.‘बारामती अॅग्रो’प्रकरणी ही चौकशी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आ. पवार यांच्या कार्यालयांवर ‘ईडी’ची छापेमारी सुरू होती; पण त्यांना आतापर्यंत चौकशीसाठी बोलावले नव्हते. पण, आता चौकशीसाठी बोलावले व त्यांची चौकशी सुध्दा केली.
आ. रोहित पवार यांनी चौकशी अगोदर सांगितले की, की ‘ईडी’ अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. शरद पवार बाप माणूस म्हणून ढाल बनून उभे राहिले, हे माझ्यासाठी भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा आहे. सूडाचे राजकारण बघता दबावाखाली माझ्यावर ‘ईडी’ने चुकीची कारवाई केल्यास घाबरुन जाऊ नये. शरद पवार यांच्यासोबत सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवून महाराष्ट्र धर्म जपायचा असे त्यांनी याअगोदर सांगितले.