इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला एक कोटी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या विमान उड्डाणांच्या सुरक्षेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. या उल्लंघनाची तपासणी केली असता एअरलाइनने नियमांचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर एअर इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गेल्या वर्षभरात विमान वाहतूक उद्योगातील सुरक्षा मानकं वाढवण्यासाठी सर्वोच्च निरीक्षण उपाय केले आहेत. गेल्या वर्षात एकूण ५४२ कारवाया करण्यात आल्या. वर्ष २०२२ मधल्या तुलनेत कारवाईत ७७ टक्के वाढ झाली आहे, असेमहासंचालनालयाने सांगितलं.