येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नगर मनमाड महामार्ग लगत दराडे पेट्रोल पंपाजवळ सुदर्शन खिल्लारे यांच्या मालकीचे एसएस मोबाईल शोरूम असून या ठिकाणी टीव्ही विक्री देखील केली जाते. २३ जानेवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या बाहेर डिस्प्ले साठी ठेवलेले टीव्ही संच मॅनेजरची नजर चुकून उचलून नेला होता.
पण, दुस-या दिवशी ही घटना लक्षात आली. त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये सदरचे चोरटे चोरी करत असताना निदर्शनास आले. ही बाब तात्काळ येवला शहर पोलिसांना कळतच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास करून अवघ्या आठ तासांच्या आत येवला शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपी श्याम कृष्णा विधाते व त्याचा साथीदार गणेश शिंदे या दोघांना अटक केली.
दरम्यान या दोघात चोरट्यांनी येवला शहर परिसरात आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा आता येवला शहर पोलीस तपास करत आहे. येवला शहराचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाबा पवार व पोलीस शिपाई गणेश पवार आदींनी ही कामगिरी केली आहे.