भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्याला राग कसा असतो व त्याचे काय परिणाम होतात हे प्रत्येकाने राग करतांना माहित ठेवणे गरजेचे आहे. पण, तरी सुध्दा रागाच्या भरात अशा काही गोष्टी होतात की त्यानंतर त्या अंगलट येतात. चाळीसगाव ते मनमाड दरम्यान रेल्वे प्रवासात अशीच एक धक्कादायक घटना घडली. जागा न मिळाल्याने एका माथेफिरुने चक्क पाळणा फेकून मारला. पण, तो कोणाच्या अंगावर नाही तर थेट पुष्पक एक्सप्रेसवर …
हा माथेफिरुन दुस-या कर्नाटक एक्स्प्रेसच्या दिव्यांग डब्यात प्रवास करत होता. त्याला जागा न मिळाल्याचा राग आल्याने त्याने धावत्या गाडीतून पुष्पक एक्स्प्रेसच्या इंजिनावर लहान मुलाचा पाळणा फेकला. आता या पाळण्याने जर काही अपघात झाला असता तर. त्याचा राग किती महागात पडला असता. आता हे प्रकरण त्याच्या अंगलट आले आहे. या प्रकरणी भुसावळ आरपीएफने त्याला ताब्यात घेतले आहे.
अशी झाली अटक
पवन कुमार वय (२६) असे या माथेफिरुचे नाव आहे. या पवनकुमारने पाळणा फेकल्याचे पुष्पकच्या लोको पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भुसावळ येथे संपर्क केले. त्यानंतर पायलटने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतले त्यानंतर त्याला अटक केली.