सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा गौरव….नाशिकमधील या अधिका-यांचा समावेश

जानेवारी 24, 2024 | 9:16 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240124 WA0331

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम केले आहे. ही प्रक्रिया अविरत सुरू असून, नव मतदारांनी नाव नोंदणी करावी. राज्यातील सर्व युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

जयहिंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २४ व २५ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते. मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केले, मतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपनगरचे डॉ. राजेंद्र भोसले, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक वाडिया, निवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटे, चित्रपट समीक्षक डॉ. संतोष पाठारे, लेखिका डॉ. निर्मोही फडके, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, अभिनेता विकास पाटील उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले की, विद्यार्थी देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थी सोबत असेल, तर भरीव कामगिरी करेल. सदिच्छा दूत, लोकशाही मित्र, उत्कृष्ट वार्तांकन, भित्तीचित्रे, घोषवाक्य, जाहिरात निर्मिती अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. याचबरोबर जिल्हाधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी , माहिती व तंत्रज्ञान समन्वयक, उत्कृष्ट समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी उत्तम कार्य केले आहे. आपण सर्वांनी मिळून राज्यातील सर्व युवा-युवतींची नावे मतदार यादीत नोंद व्हावी यासाठी आपले कार्य असेच यापुढेही सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे आहे.

एकत्रित संख्येने काम केल्यास काहीही शक्य नाही. आणि एकी चा प्रत्यय मुंगी देते, म्हणूनच निवडणूकीचे शुभचिन्ह म्हणजेच मॅस्कॉटचे आज सदिच्छा दूत प्रणित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचे राहुल कर्डिले, अकोला जिल्ह्याचे अजित कुंभार, पुणे विभागात जितेंद्र डुडी, नाशिक विभाग मनीषा खत्री, छत्रपती संभाजीनगर विभागात डॉ. सचिन ओम्बासे, कोकण विभागात किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आला.

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग- स्वीप उपक्रम राबवून मतदार यादी दुरूस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि स्वीप नोडल अधिकारी , मतदार नोंदणी अधिकारी यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर विभागात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, अमरावती विभागात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे, मतदार नोंदणी अधिकारी वैशाली देवकर, पुणे विभागात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप नोडल अधिकारी डॉ. अर्चना तांबे, नाशिक विभागात जिल्हाधिकारी जलज शर्मा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, स्वीप नोडल अधिकारी शुभांगी भारदे, नांदेड विभागात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण, मतदार नोंदणी अधिकारी शरद मंडलिक, कोकण विभागाचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, मतदार नोंदणी अधिकारी जीवन देसाई यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट उप जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर विभाग:- उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित, अमरावती विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, पुणे विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, नाशिक विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ, छत्रपती संभाजी नगर विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, कोकण विभाग उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार पुणे विभाग :- मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे, मतदार नोंदणी अधिकारी सुरेंद्र नवले, नागपूर विभाग मतदार नोंदणी अधिकारी वंदना सौरंगपते, कोकण विभाग मतदार नोंदणी अधिकारी अमित सानप, आकाश लिगाडे, नाशिक विभाग मतदार नोंदणी अधिकारी विशाल नरवडे, मतदार नोंदणी अधिकारी सुभाष दळवी, अमरावती विभाग मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेराव, मतदार नोंदणी अधिकारी ललितकुमार वराडे, छत्रपती संभाजी नगर विभाग मतदार नोंदणी अधिकारी सुशांत शिंदे, मतदार नोंदणी अधिकारी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट माहिती व तंत्रज्ञान समन्वयक पुरस्कार राज्य माहिती व तंत्रज्ञान समन्वयक कैलास हिरे यांना प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार :- रत्नागिरी जिल्हा जिल्हाधिकारी वैभव आंबेरकर, ठाणे जिल्हाधिकारी अजिंक्य दिवेकर, पुणे जिल्हामनोज पुराणिक, ठाणे जिल्हा विलास पाटील यांना समाजमाध्यम समन्वयक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार :- सोसायटी फॉर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, पुणे, डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालय, पुणे, आर.एन.सी. महाविद्यालय , नाशिक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे, रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, अहमदनगर या महाविद्यालयांनी निवडणूक साक्षरता मंडळांसाठी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने त्यांना गौरविण्यात आले.

उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पुनम शिंदे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे शरद गव्हाळे, सुशिलादेवी महाविद्यालयाचे शिवाजी मोहळे यांना प्रदान करण्यात आला. विनयन वाघमारे, निकीता सालगुडे, भारती डोईफोडे यांना उत्कृष्ट विद्यार्थी सदिच्छा दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला.सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी सोबत सहयोगी संस्थांना विशेष संस्थात्मक मतदार मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.विशेष संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार बबन पारधी, चंद्रकांत गडेकर, अरुण जाधव, राजू अवताडे, कडुदास कांबळे, मारूती बनसोडे, शैला यादव यांना प्रदान करण्यात आला.

विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना प्रदान करण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार निशा नांबियार यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिव्यक्ती मताच्या स्पर्धेत उत्कृष्ट भित्तिपत्रकासाठी धनश्री भागडकर यांना प्रथम पुरस्कार, उत्कृष्ट घोषवाक्यास साक्षी चक्रदेव यांस प्रथम पुरस्कार, उत्कृष्ट जाहिरातनिर्मिती स्पर्धेत तेजस साळगावकर यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत राजभवन येथे असा साजरा झाला उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस….

Next Post

या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल…जाणून घ्या, गुरुवार, २५ जानेवारीचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल…जाणून घ्या, गुरुवार, २५ जानेवारीचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011