इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरातील बाजीराव नगर येथून दहशतवाद विरोधी पथकाने एका संशयताला ताब्यात घेतले आहे. या संशयिताचे हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) असे आहे.
या संशयिताकडे सात मोबाईल सिम कार्ड लॅपटॉप, डेबिट कार्ड आणि अन्य बरेच साहित्य मिळाले आहे. या व्यक्तीने पाकिस्तानातील राबिया ओसामा या महिलेला विविध प्रमाणात वेगवेगळ्या वेळी पैसे पाठवल्याचे दहशतवाद विरोधी पथकाला आढळून आले आहे. हे पैसे का पाठवले यासंदर्भात तसेच त्याचे पाकिस्तानशी नेमके काय संबंध आहेत हे जाणून घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
या संशयिताची कसून चौकशी सुरू आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांना या संदर्भात फारशी माहिती नव्हती.