मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील चंदनपुरीमधील खंडोबा महाराजांच्या यात्रेला उद्या पासून सुरुवात होणार आहे. त्या अगोदर जेजूरी येथून आणलेली मशाल ज्योत मालेगाव मध्ये दाखल झाली. तिची वाजत-गाजत चंदनपूरी पर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.
सायंकाळी या ज्योती व्दारे खंडोबा महाराजांच्या मंदीरातील दिपमाळीचे प्रज्वलन करण्यात आले. बहिणाबाईचे माहेरघर असलेल्या चंदनपूरी येथे उद्या पासून १५ दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.