गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमित शहा आणि एकनाथ शिंदे शनिवारी नाशिक दौऱ्यावर.. हे आहे कार्यक्रम

by Gautam Sancheti
जानेवारी 24, 2024 | 2:11 pm
in स्थानिक बातम्या
0
amit shah11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महाराष्ट्राची सहकारी परंतरा विकासात्मक व प्रगतीशीलतेचा वेध घेणारी असून जनतेच्या आर्थिक सबलीकरणाचा तो मूलभूत आधार आहे. आजच्या कॉर्पोरेट युगात नागरी सहकारी बँकांनी व्यावसायिक बँकांशी स्पर्धा करण्याची क्षमता आपल्यात निर्माण केली आहे. यापुढचे पाऊल म्हणजे डिजिटलायझेशन, माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगवान वापर व भविष्यातील आव्हाने यावर विचारमंथन होण्यासाठी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनच्यावतीने नाशिक येथे शनिवार २७ व रविवार २८ जानेवारी २०२४ रोजी ‘महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स् परिषद २०२३-२४ भव्य आयोजन करण्यात आले आहे. सहकार परिषदेच्या स्वागताध्यक्षा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री मा.ना.डॉ. भारतीताई पवार मुख्य आधारस्तंभ म्हणून खा. हेमंत गोडसे असून परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका येथे ही दोन दिवसीय सहकार परिषद संपन्न होणार आहे.

या सहकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी/सरव्यवस्थापक/वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

शनिवार २७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शहा यांचे शुभहस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गौरवशाली सहभाग चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑपरेटिव्ह) सहकार मंत्रालय, भारत सरकार मा.खा. सुरेश प्रभू, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्य मंत्री मा.ना.डॉ. भागवत कराड, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना. दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नाशिक मा.ना. दादाजी भुसे, विशेष उपस्थिती म्हणून माजी महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.आ. बाळासाहेब थोरात, परिषदेतील उल्लेखनीय सहभाग म्हणून खा.डॉ. सुभाष भामरे, आ. देवयानी फरांदे, आ. सिमाताई हिरे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, आ. सत्यजित तांबे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, परिषदेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, विशेष सहभाग सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा डॉ.शशिताई अहिरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष व प्रशासक विद्याधर अनास्कर, नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे अध्यक्ष दिलीप संघाणी, नॅफकब नवी दिल्लीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, सारस्वत को-ऑप. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

तर रविवार २९ जानेवारी रोजी संपन्न होणार्‍या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार मा.ना. नितीन गडकरी, मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ, प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नाशिक दादा भुसे, गौरवशाली सहभाग म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना. नरहरी झिरवळ, माजी केंद्रीय मंत्री मा.खा. अरविंद सावंत, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.आ. जयंत पाटील, ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विशेष उपस्थित राहणार आहेत

सहकार परिषदेच्या निमित्ताने २ दिवस बँकिंग क्षेत्रातील आव्हानांचा व व्यवस्थापनातील नवनवीन बदलांचा वेध घेणार्‍या 6 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहकार व बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. ‘नागरी सहकारी बँकांपुढील आव्हाने’ हा पहिला परिसंवाद शनिवार २७ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ३.३० या वेळात संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तर वक्ते म्हणून रविंद्र दुरुगकर, शैलेश कोतमिरे, सत्यनारायण लोहिया हे असून मॉडरेटर म्हणून रूपा देसाई या असणार आहेत.

‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आणि सहकारी बँका’ हा दुसरा परिसंवाद शनिवार २७ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ ते ४.४५ या वेळात संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता तर वक्ते म्हणून प्रंचित पोरेड्डीवार, अ‍ॅड.सुभाष मोहिते हे असून मॉडरेटर म्हणून वसंतराव खैरनार हे असणार आहेत. ‘बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट व नागरी सहकारी बँका’ हा तिसरा परिसंवाद रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात
संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष मिलिंद काळे तर वक्ते म्हणून लक्ष्मण संगेवार, जयवंत जालगांवकर, आनंद कटके हे असून मॉडरेटर म्हणून अजय ब्रम्हेचा हे असणार आहेत.

‘केंद्रीय सहकार मंत्रालय; सहकाराची नवी दिशा’ हा चौथा परिसंवाद रविवार २८ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ ते ११.४५ या वेळात संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष अतुल खिरवडकर तर वक्ते म्हणून प्रविण यशवंत दरेकर, प्रा. संजय नथूजी भेंडे, अविनाश जोशी हे असून मॉडरेटर म्हणून हेमंत धात्रक हे असणार आहेत. ‘सहकार चिंतन व शाश्‍वत मुल्यांची विश्वासार्ह परंपरा’ हा पाचवा परिसंवाद रविवार २८ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या वेळात संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष अनिल कवडे तर वक्ते म्हणून वैशाली आवाडे, श्रीराम देशपांडे, सिताराम आडसुळ, अजय मुंदडा हे असून मॉडरेटर म्हणून विश्वास ठाकूर हे असणार आहेत.

‘डिजिटल क्रांतीचे फलित-व्यापार, व्याप्ती, वर्तमान’ हा सहावा परिसंवाद रविवार २८ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ ते ४.१५ या वेळात संपन्न होणार असून त्याचे अध्यक्ष रवीकिरण मंकीकर तर वक्ते म्हणून विवेक जुगादे, राजन सोनटक्के, अजय निकुंभ, मिलिंद आरोलकर हे असून मॉडरेटर म्हणून आर्कि. अमृता पवार या असणार आहेत.

या सहकार परिषदेसाठी दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, कॉसमॉस को-ऑप. बँक लि., सारस्वत को-ऑप. बँक लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., सिक्युअर टेक आय टी सोल्युशन्स प्रा.लि., ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स, सीआयओ न्युज, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिडको, महाराष्ट्र, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सहकार परिषदेच्या निमित्ताने भारतातील विविध माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या तसेच बँकिंग क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी लागणार्‍या उत्पादनांचे स्टॉल्स असणार आहेत.

या राज्यस्तरीय सहकार परिषदेसाठी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्षा मा.ना.डॉ. भारतीताई पवार, खा.हेमंत गोडसे सहकार परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर, परिषदेचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिशनचे कार्याध्यक्ष महेंद्र बोरा, उपाध्यक्ष राजेश भांडगे, संचालक डॉ. शशिताई अहिरे, दत्ता गायकवाड, हेमंत धात्रक, राजेंद्र (नाना) सूर्यवंशी, नानासाहेब सोनवणे, अशोक झंवर, संजय वडनेरे, हिरालाल सुराणा, अशोक तापडीया, शरद कोशिरे, सुनिल गिते, कैलास येवला, राजकुमार संकलेचा, मनोज गोडसे, शरद दुसाने, वसंत खैरनार, नितीन वालखेडे, रत्नाकर कदम, अबीद अहमद अब्दुल रशीद, मिर्झा सलीमबेग जब्बारबेग यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर लढण्याच्या तयारीत…इंडिया आघाडीला मोठा धक्का

Next Post

भारतीय हवाई दलाने केला एक्स-डेझर्ट नाईट सराव…हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
Next Post
Photo30AJM scaled e1706088353680

भारतीय हवाई दलाने केला एक्स-डेझर्ट नाईट सराव…हे आहे कारण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011