नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक न्यायाचे प्रणेते, दिवंगत नेते, कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न (मरणोत्तर) जाहीर झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. कर्पूरी ठाकुर यांच्या जन्मशताब्दीमध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या निर्णयामुळे देशवासियांच्या मनात अभिमान जागृत होईल. मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी आणि वंचितांच्या कल्याणाप्रती त्यांची अविचल वचनबद्धता आणि दूरदृष्टीने परिपूर्ण असे त्यांचे नेतृत्व यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यावर अमीट ठसा उमटवला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिहराचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते स्वर्गीय कर्पुरी ठाकूर जी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. स्व.कर्पूरी ठाकूर जी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान दलित, वंचित आणि उपेक्षित घटकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करेल. स्वर्गीय कर्पूरी ठाकूरजींना ‘भारतरत्न’ देण्याची आमची नेहमीच मागणी आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण झाली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.