नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी नाशिकमध्ये सोमवारी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियासह गोदा घाटावर महाआरती केली. आता त्यांची सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होत आहे. या सभेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. या सभेत उध्दव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेत उध्दव ठाकरे म्हणाले की, देश के लिए ‘मन की बात’ आणि गुजरात के लिए ‘धन की बात’! असे सांगत त्यांनी टीका केली. ते म्हणाले की,बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी! ईडी, सीबीआय, आयटी हे तुमचे घरगडी आमच्या निर्दोष शिवसैनिकांच्या घरावर धाडी घालतायत. राम मंदिर बनविण्यासाठी, ३७० कलम काढण्यासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येकवेळी भाजपला पाठिंबा दिला.
महाराष्ट्रात संकटात असताना मोदीजी कुठे होते? आता फक्त मतांसाठी येत आहेत. मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. यावेळी ठाकरे म्हणाले हे सत्तेत असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ असेल तर खुर्ची सोडून द्या, आम्ही सक्षम आहोत. आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही .
महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलंय? संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं, त्या महाराष्ट्राच्या मुळावर का घाव घालताय? छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती. मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडत आहात. महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही. तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. मोदीजी, हे हिंदुत्व नाही! ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा!
सकाळी अधिवेशनात उध्दव ठाकरे यांनी राम की बात हो गयी, अब काम की बात करो!…प्रभू श्रीरामांचा एकतरी गुण तुमच्यात आहे का? राम एकवचनी होते, तुम्ही वचन मोडणारे आहात. जो जो महाराष्ट्रावर चाल करून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला, हा ह्या मातीचा महिमा आहे. आज रामाचे मुखवटे घालून जे रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचेत!.. असे सांगितले.
आता ते या सभेत काय बोललात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बघा ही सभा लाईव्ह