गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमळनेरला विद्रोही मराठी साहित्य संमेलन….सुप्रसिद्ध हिंदी व्यंगकवी संपत सरल करणार उद्घाटन

by Gautam Sancheti
जानेवारी 23, 2024 | 6:46 pm
in संमिश्र वार्ता
0
sampat saral


धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
खानदेशातील अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी अठराव्या विद्रेाही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर हे कर्मभूमी राहिलेल्या साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमलेनाचे आशयसूत्र ’प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता‘ या मूल्य समर्थनार्थ आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभलेले व्यंगकवी संपत सरल व दोनदा साहित्य अकादमी विजेते प्रख्यात उर्दू साहित्यिक रहेमान अब्बास ह्यांची उपस्थिती लाभणार आहे, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, विद्रोही संमेलन अमळनेर चे मुख्य संयोजक लीलाधर पाटील,व प्रवर्तक अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. याप्रसंगी अमळनेर येथील १८ व्या विद्रोही साहित्य संमलेनाच्याआयोजन संदर्भात माहिती देण्यात आली.

महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार, प्रा. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते,चंद्रकांत वानखेडे आदी सर्जनशील, प्रगतीशील, साहित्यिक, नाटककार, कवी, समीक्षक आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.

१८ व्या विद्रोही साहित्य संमलेन, अमळनेर येथील प्रस्तावित अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांनी विपुल प्रमाणात, दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. ’विषवृक्षाच्या मुळ्या‘ ही कादंबरी, ’व्यथाफूल‘, ’अबॉर्शन आणि इतर कथा’, ’अंधाररंग’, ’झाड आणि समंध’ इ. कथासंग्रह ’झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथन इत्यादी ललित साहित्य प्रसिद्ध असून ’सहा दलित आत्मकथने’, ’ग्रामीण कथा स्वरूप व विकास’, ’ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा’, ’नवे साहित्य नवे आकलन’, साहित्य : ’रूप आणि स्वरूप’, ’ग्रामीण साहित्य चिंतन आणि चर्चा’, ’साहित्य, समाज आणि परिवर्तन’ इत्यादी समीक्षात्मक ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्र, आत्मकथन इत्यादी विविध साहित्य प्रकारांमधून त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचे आजवर सहा कथासंग्रह, एक कादंबरी, चौदा समीक्षात्मक ग्रंथ, एक दीर्घ कथा संग्रह, एक एकांकिका आणि आत्मकथनासह पंधरा संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

संपत सरल, आज हे नाव जगभर विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील शेखावती या गावचे मूळ रहिवासी आहेत . हास्य व व्यंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा विद्रोही कवी म्हणून त्यांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. संपत सरल यांनी संपूर्ण भारतासह यूएसए, कॅनडा,सौदी अरेबिया आणि नेपाळ आदी विविध देशात आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. ’चाकी देख चुनाव की’ आणि ’छद्मविभूषण’ हे त्यांचे काव्य संग्रह तर ’हम है ना’, ’करम धरम’, ’चक्कर पे चक्कर’, ’बेटा बेटी के लिए’, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत. तर रहेमान अब्बास हे प्रख्यात उर्दू कादंबरीकार विद्रोही संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.रहेमान अब्बास हे मूळ चिपळूण चे रहिवासी असुन त्याना रोहजिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पारितोषक २०१८ मध्ये मिळाले आहे तर २०११ व२०१७ ची राज्य पारितोषिक चे ते मानकरी आहेत. उर्दू बरोबरच इंगर्जी तून त्यांची हाईड अँड सीक इन द श्याडो ऑफ गॉड ही कादंबरी प्रसिद्ध आहे.राजकारण आणि प्रेम हे त्यांच्या लिखाणात महत्वाचे विषय आहेत.

यंदाचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मध्ये भरविले जाणार आहे. अमळनेरची भूमी ही ’खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पाव‘ असा खरा प्रेममय धर्म सांगत अन्यायाच्या विरोधात ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान‘ असे अजरामर गीत लिहून मंदिर प्रवेशासाठी महाराष्ट्र जागर करून उपोषण करणार्‍या साने गुरुजींची कर्मभूमी आहे. यंदाचे हे संमेलन आम्ही ‘प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वतंत्र, बंधुता‘ या मूल्य समर्थनार्थ या आशय सूत्रावर आधारित घेत आहोत. धुळे रोडवरील आर. के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार असून दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात ३ परिसंवाद, २ कवी संमेलने,१२ गटचर्चा, कथाकथन, युवा मंच,गझल संमेलन,नाटक, एकपात्री, बालमंच, विचार यात्रा इ. असणारी आहे.

खानदेशात पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत व त्यांच्या १२५ व्या जन्मवर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेरसह खानदेशातील धुळे जिल्ह्यातील विद्रोही साहित्यिक व समविचारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे विविधांगी योगदान देत आहेत. त्याचाच भाग म्हणून संमेलनाच्या आयोजनात आणि संयोजनात सर्वसामान्यांचे देखील हातभार लागावेत आणि प्रातनिधिक योगदान मिळावे, यासाठी एक मूठ धान्य दान आणि एक रुपया देणगी मोहीम धुळे शहरातील ऐतिहासिक आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आवाहन फेरीचे आयोजन बुधवार, २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता आयोजित केले जाणार आहे.

पत्रकार परिषदेला विद्रोही मराठी साहित्य चळवळीचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले, प्रवर्तक साथी अविनाशभाई पाटील, अमळनेर संयोजक प्रा. डॉ. लीलाधर पाटील,एल जे गावीत, राज्य पदाधिकारी यांच्यासह खानदेश साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील, अंकुर साहित्य संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. राम जाधव यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे राज्य पदाधिकारी चंद्रशेखर पाटील पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरीवर ‘महादुर्ग’ महोत्सव…

Next Post

प्रजासत्ताक दिन संचलनचे देशभरातील हे २५० जण जोडीदारासह राहणार विशेष पाहुणे…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 139

प्रजासत्ताक दिन संचलनचे देशभरातील हे २५० जण जोडीदारासह राहणार विशेष पाहुणे...

ताज्या बातम्या

Untitled 61

मालेगाव बॅाम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…१७ वर्षानंतर निकाल

जुलै 31, 2025
IMG 20250731 WA0002

पुरोहित संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची घेतली भेट…कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा

जुलै 31, 2025
cbi

घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर सीबीआयची मोठी कारवाई…४७ ठिकाणी छापे

जुलै 31, 2025
Untitled 60

मुंबईत ६ कोटी ५० लाखाची निकृष्ट दर्जाची चिनी खेळणी, बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

जुलै 31, 2025
crime1

दांम्पत्याने हॉटेल मालकाकडे मागितली सात लाख रूपयांची खंडणी…गु्न्हा दाखल

जुलै 31, 2025
fir111

शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेस चार लाखला गंडा…गुन्हा दाखल

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011