नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुंड्यात ठरलेली दोन तोळे वजनाची सोन्याची अंगठी माहेरून आणावी या मागणीसाठी सासरच्या मंडळीने विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश जाधव,लिलाबाई जाधव,नणंद हर्षदा हिरे व बबलू हिरे (रा.सर्व कुंदेवाडी ता.सिन्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आडगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या विवाहीतेने फिर्याद दिली आहे.
२०२१ मध्ये पीडितेचा दुर्गेश जाधव याच्याशी विवाह झाला असून, हुंड्यात ठरलेली दोन तोळे वजनाची सोन्याची अंगठी माहेरून घेवून यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षापासून तिचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू आहे. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.