नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी नाशिकमध्ये सोमवारी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियासह गोदा घाटावर महाआरती केली. आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याअगोदर शिवसेनेचे महाअधिवेशन सातपुर येथील डेमोक्रेसी हॅाटेलमध्ये होत आहे. या अधिवेशनात उध्दव ठाकरे बोलत असून त्यांचे थेट प्रक्षेपण आपण बघा…..
या अधिवेशनात ठाकरे म्हणाले की, राम की बात हो गयी, अब काम की बात करो!…प्रभू श्रीरामांचा एकतरी गुण तुमच्यात आहे का? राम एकवचनी होते, तुम्ही वचन मोडणारे आहात. जो जो महाराष्ट्रावर चाल करून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला, हा ह्या मातीचा महिमा आहे. आज रामाचे मुखवटे घालून जे रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचेत!.. असे त्यांनी सांगितले.
सायंकाळी सभा
अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभर काल उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर हे अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. त्यानंतर ठाकरे यांची सायंकाळी ७ वाजता पहिलीच सभा आहे. या सभेकडे सत्ताधा-यांचे लक्ष असणार आहे. गेल्या काही दिवासांपासून ठाकरे गटाने नाशिकमध्ये दर्शन, आरती व राज्यस्तरीय अधिवेशन व सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कालपासून नाशिकमध्ये
सोमवारी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये विमानाने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महापूजा करुन गोदा घाटावर महाआरती केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.