इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्याः आजची सकाळ देशासाठी खास आहे. हे प्रत्येक राम भक्तासाठी खास आहे, कारण आज पहिली पहाट आहे, जेव्हा राम लल्ला भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आजपासून राम मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. सकाळपासून दर्शनासाठी गर्दी उसळली होती.
रामललाच्या दर्शनासाठी सध्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या अयोध्येतील तापमान सहा अंशांवर आहे; मात्र कडाक्याची थंडी असूनही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. सर्वजण राम रंगात रंगले आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर आजपासून भाविकांना दर्शन खुले झाले आहे. रामलल्लाचे दर्शन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.
दुपारी दोन तास मंदिर बंद असेल. दुपारी १२ वाजता रामलल्लाची भोग आरती होणार असून सायंकाळी साडेसात वाजता आरती होणार आहे. यानंतर रात्री साडेआठ वाजता शेवटची आरती करून रामलल्लाला झोपवले जाईल. आरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मोफत पास घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाइटनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून ऑफलाइन पास श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून मिळवता येतो.