इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी संपन्न झाला असला तरी या सोहळयाची चर्चा महिनाभर होती. त्यामुळे देशात राममय आणि भक्तिमय वातावरणचा ज्वेलरी उद्योगालाही फायदा झाला आहे.
अनेक ज्वेलर्सनी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा लक्षात घेऊन मंदिर-शैलीतील डिझाइन आणि प्रभू रामाचे चित्र असलेले नवीन ‘कलेक्शन’ तयार केले असून त्याला चांगलीच मागणी आहे.
देशातील अनेक ज्वेलर्सने सीताराम, श्री राम आणि राम दरबारच्या सोन्या-चांदीच्या मूर्तीं तयार केल्या आहे. त्यांना चांगली मागणी आहेत. राम मंदिराच्या लोकार्पणा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामांची चलती असणार हे हेरुन ज्वेलर्सनेही आपल्या दगिण्यांच्या डिझाइनही राममय केल्या आहे.