सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपूरमध्येच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी केली श्रीरामाची आराधना…

by Gautam Sancheti
जानेवारी 23, 2024 | 12:19 am
in राज्य
0
Jansamprak karyalay2 scaled e1705949328438

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) शहरातील विविध ठिकाणी श्रीरामाची पूजा अर्चना तसेच आराधना केली.

पोद्दारेश्वर राम मंदिर, खामला येथील जनसंपर्क कार्यालय आणि बजेरिया येथील अवध महोत्सवाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. सकाळी एन्रिको हाईट्स येथील निवासस्थानी आयोजित पूजेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले. यावेळी त्यांनी रामरक्षा, हनुमान स्तोत्र पठण तसेच श्रीरामाची आरती केली. यावेळी सौ. कांचनताई गडकरी, निखिल गडकरी, सौ. ऋतुजा गडकरी, नातवंड तसेच संपूर्ण गडकरी कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. यावेळी सोनुताई अग्निहोत्री मूकबधिर शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी बजेरिया येथील अवध महोत्सवाला हजेरी लावली. याठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. येथील दिव्यांची आकर्षक आरास बघून त्यांनी मंदिर समितीचे कौतुक केले. यावेळी आमदार प्रवीण दटके यांची उपस्थिती होती.

त्यानंतर नितीन गडकरी यांनी खामला येथील जनसंपर्क कार्यालयात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण बघितले. याप्रसंगी भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होताच गडकरी यांच्यासह नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. श्रीरामाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गडकरी यांनी सर्व नागरिकांना श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा दिल्या.

स्वप्न साकार झाले : नितीन गडकरी
अयोध्या धाममध्ये कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा हे रामराज्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याबद्दलचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, परम आदरणीय सरसंघचालक श्री. मोहन भागवतजी आणि सर्व संतांच्या उपस्थितीत श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला; मन प्रसन्न झाले. आज सर्व भारतीयांचे स्वप्न साकार झाले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ‘हजारो कारसेवक आणि रामभक्तांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. प्रभू श्रीरामाच्या या मंदिरासाठी शतकानुशतके झगडणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या सर्व कारसेवकांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्या धाममध्ये ६५ वर्षीय वृद्ध हृदयविकाराचा झटका… काही मिनिटात मिळाले असे वैद्यकिय उपचार

Next Post

नाशिकमध्ये आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार….जाहीर सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
udhav1

नाशिकमध्ये आज उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार….जाहीर सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

fire 1

मेणबत्ती पेटवित असतांना गंभीर भाजलेल्या ८४ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 4, 2025
rape

एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग…गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
Show e1754275627463

नाशिक येथे या तारखेला महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा…नाट्यरसिकांना दोन दिवस मेजवानी

ऑगस्ट 4, 2025
image0042EZO

या तीन नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरु….रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा

ऑगस्ट 4, 2025
cbi

मुंबईत सीमाशुल्क अधीक्षकाला १० लाख २० हजाराची लाच घेताना सीबीआयने केली अटक

ऑगस्ट 4, 2025
Untitled 3

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011