नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत आरोग्य मैत्री प्रकल्पाच्या भीष्म क्यूब या आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणून तैनात फिरत्या रुग्णालयाने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान रामकृष्ण श्रीवास्तव हे ६५ वर्षीय वृद्ध हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध पडल्यावर वेळेवर वैद्यकीय उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
भीष्म क्यूबमधील भारतीय वायुदलाच्या शीघ्र प्रतिसाद दलाने घटनेच्या एका मिनिटात श्रीवास्तव यांना बाहेर काढले, ज्यामुळे एखाद्या दुखापतीनंतर किंवा वैद्यकीय घटनेनंतरच्या यशस्वी आपत्कालीन उपचारांसाठीच्या पहिल्या महत्वपूर्ण तासाचा फायदा घेतला गेला.
प्राथमिक तपासणीनंतर श्रीवास्तव यांचा रक्तदाब 210/170 mmHg या धोकादायक पातळीवर असल्याचे आढळले. वैद्यकीय चमूने त्याचे योग्य निदान करून नियमावलीनुसार त्यांच्यावर योग्य उपचार केले.
या त्वरित उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. भीष्म क्यूबच्या प्रगत सुविधा आणि कुशल वैद्यकीय कर्मचार्यांनी श्रीवास्तव यांना जागेवरच रुग्णालयाच्या गुणवत्तेची सेवा मिळण्याची खातरजमा केली ज्याद्वारे आपत्कालीन परिस्थितीतील पहिल्या सुवर्ण तास मानल्या जाणाऱ्या उपचाराधीन तासात त्यांची प्रकृती सावरली. या महत्त्वपूर्ण हस्तक्षेपामुळे पुढील तपासणी आणि विशेष व्यवस्थापनासाठी नागरी रुग्णालयात त्यांना सुरक्षितपणे हलवता आले.