नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वाहनचोरीबरोबरच भुरट्या चो-याही वाढल्या असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच दुचाकीसह एक सायकलही चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालखेड ता.निफाड येथील सोमनाथ शंकर चौधरी शनिवारी (दि.२०) शहरात आले होते. गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण भागात त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ जीडब्ल्यू ११५० पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना द्वारका भागात घडली. संदिप सुरेश काठे (रा.चंद्रभागा कॉम्प्लेक्स,मथुरा हॉटेलमागे) यांची शाईन दुचाकी एमएच १५ ईएम १९८९ गेल्या गुरूवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रेहरे करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. श्रीराम गहिनीनाथ खोसे (रा.मारूतीमंदिराजवळ,अंबड) यांची प्लेझर एमएच १५ सीआर ०३७३ गेल्या शनिवारी (दि.१३) वैष्णवी पॅलेस रो हाऊस कारगिलचौक येथे पार्क केलेली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.
चौथी घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली. विरेंद्र राजेंद्र ढेपले (रा.दत्तनगर,चुंचाळेशिवार) यांनी फिर्याद दिली आहे. ढेपले यांची स्प्लेंडर एमएच १५ जेबी २५६७ नारखेडे स्विचगेअर कंपनीच्या वॉल कंपाऊडजवळ लावलेली असतांना ती अभिषेक प्रशांत सोनम (रा.त्रिमुर्ती चौक,सिडको) याने चोरून नेली. ही घटना १४ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
पाचवी घटना पाथर्डी शिवारात घडली. राजू धनाजी पालवे (रा.पार्क साईट,वडाळा पाथर्डीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पालवे यांची पॅशन प्रो एमएच १५ ईयू ११०५ पाथर्डी गौळाणे रोड वरील द्वारकाधिश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती शुक्रवारी (दि.१९) चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलीसांनी चेतन श्रीराम जंजाळ (रा.निर्णान वृंदावन गार्डन सोसा.केदारनगर,श्रमिकनगर) यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत. तर रत्नाकर भाऊराव लेंडे (रा.उमंग प्लाझा,वृंदावन हौ.सोसा.सिंहस्थनगर सिडको) यांची सुमारे दहा हजार रूपये किमतीची कोरोडाना कंपनीची सायकल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गेल्या शनिवारी (दि.१३) घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक शिरवले करीत आहेत.