नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते महापूजा केली. त्यानंतर गोदा घाटावर येऊन महाआरती केली. ठाकरे गटाने नाशिकमध्ये दर्शन, आरती व राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी केली होती. मंगळवारी ते राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी होणार आहे.
आज उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये विमानाने दाखल झाले. त्यानंतर ते भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर २ वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू हॉटेलकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर गोदा घाटावर महाआरती झाली.
मंगळवारी २३ तारखेला सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन या सभेत अभिवादन करुन महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे.