नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठाणा सोहळा संपन्न झाल्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरातही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळपासून ही गर्दी सुरुच होती. पण, त्यानंतर त्यात वाढ झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघ्या देशवासीयांच्या स्वप्नातले भव्य राम मंदिर अयोध्यात सत्यात उतरल्यामुळे देशभर भक्तीमय वातावरण आहे. काळीराम मंदिराबरोबरच हीची गर्दी गोदाघाटावरही होती.
नाशिकमध्ये सुध्दा गेल्या काही दिवासांपासून या सोहळयाची तयारी सुरु होती. ठिकठिकाणी रामायणातील प्रसंगाचे चित्र मोठ्या भितींवर ऱेखाटले गेले. गोदाघाट व मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. ठिकठिकाणी रांगोळी, भगवे झेंडे, बॅनर व पोस्टरही लावण्यात आले. तर शहरात बहुसंख्य ठिकाणी रोषणाई करण्यात आली. त्यामुळे राममय वातावरण नाशिकमध्ये झाले आहे. त्यामुळे गर्दीने आज विक्रमही मोडले.
अयोध्येत प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न
अयोध्येत आज पहाटे श्रीरामाची मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला. या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत, महंत आणि विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत होते. पाचशे सेलिब्रिटी अयोध्येत दाखल झाले. फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. अयोध्येसह देशभरातील मंदिरांमध्ये राम संकीर्तन आणि राम चरित मानसाचे पठण सुरू आहे.