इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्यामध्ये आज होणा-या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेख बच्चनसह मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थितीत झाले आहे. या कलाकारांमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षय कुमार,जॅकी श्रॉफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या तमिळ सुपरस्टार रजिनीकांत, तेलुगू अभिनेते प्रभास, अल्लु अर्जुन आणि ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी, मोहनलाल, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, अनुपम खेर, अजय देवगण, कंगणा रणौत, माधुरी दीक्षित, भाजप खासदार हेमामालिनी आणि सनी देओल यांचा समावेश आहे. काही कलाकार रविवारीच दाखल झाले होते.
त्याचप्रमाणे प्रख्यात सरोदवादक अमजद अलीखान, गीतकार व कवी मनोज मुंतशीर आणि त्यांची पत्नी, गीतकार व लेखक प्रसून जोशी, दिग्दर्शक संजय भन्साळी यांनाही सरकारी अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायिका श्रेया घोषाल, कैलास खेर, शंकर महादेवन, अनुप जलोटा, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे. हे सुध्दा या सोहळ्याला उपस्थितीत आहे.