नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) ‘– खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे’ असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर अवघ्या काही तासात मनसैनिकांनी टोल नाके गाठत आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन टोल आंदोलना संदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणीही कुठलीही भूमिका घेऊ नये ही सूचना दिली आहे.
सोमवारी मनसैनिकांनी राज्यभर आंदोलन केले. यावेळी खासगी लहान वाहनांना विना टोल सोडण्यत आले. नाशिक जिल्ह्यात नाशिक व चांदवड येथे आंदोलन करण्यात आले. नाशिक येथे मनसैनिक व पदाधिकारी यांनी टोल गाठत आंदोलन केले. आता हे आंदोलन तूर्तास करुन नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढे ते केव्हा होते हे पुढील सुचना आल्यानंतरच समजणार आहे.