नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे पाच दिवसापूर्वी दुस-यांना लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते. पण, त्यानंतर खा. फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकीकडे शरद पवार गटाची सुनावणी निवडणूक आयोगाकडे सुरु असतांना ही आनंदाजी बातमी शरद पवार गटाला मिळाली आली. फैजल यांचे एकाच वर्षात दोनदा निलंबन झाले व दोनदार पुन्हा ते बहाल करण्यात आले. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर संख्याबळावर एकमेकांत रस्सीखेच सुरु असतांना शरद पवार गटाला मोठा दिलासा आहे.
याअगोदर खा. फैजल यांना न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व गेले होते. त्यावेळेस निवडणूक आयोगाने लक्षद्वीप लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यासाठी अधिसूचनाही जारी केली होती. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायलयाला सहा आठवड्यात पुर्नविचार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जोपर्यंत उच्च न्यायलय निर्णय घेत नाही. तोपर्यंत शिक्षा स्थगित राहिल असेही स्पष्ट केले होते.
त्यानंतर केरळ उच्च न्यायालाने खा. फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर लोकसभेतून निलंबन करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांनी पुन्हा अपात्र केले. त्यानंतर खा. फैजल यांना सर्वोच्च न्यायलयाने दिलासा दिला.
खा. फैजलवर यांच्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद आणि मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ३२ जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यापैकी चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यामध्ये मोहम्मद फैजलचाही समावेश होता.
NCP MP from Lakshadweep Mohammad Faisal from Lok Sabha