नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राम लल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त साजरी करण्यात येणाऱ्या दिवाळीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या सह युवक पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई केली आहे.
अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडत आहे. यानिमित्त संपूर्ण नाशिक भक्तिमय झाले असून प्रत्येक घरात दिवाळी स्वरूप आले आहे. सर्व नाशिककरांचे घर सजले असून सर्वांनी आपापल्या घराची साफसफाई केली आहे. कार्यक्रमाचे महत्व पाहता २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहरातील प्रत्येक मंदिरात दीप प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्यात येणार आहे. नाशिक मध्ये विविध पक्षाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असून त्यानिमित्ताने सर्व मंदिरात गर्दी होणार आहे.
नाशिक मध्ये प्रभू रामचंद्र वनवासा करिता होते. याकरिता नाशिकचे वेगळे महत्व असल्याने अयोध्येत जाणे शक्य नसलेले नाशिकमध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नाशिक शहर सुंदर दिसावे. प्रत्येकांच्या नजेरेत भरावे याकरिता युवक राष्ट्रवादी देखील पुतळ्यांची साफसफाई करणार केली आहे.
संपूर्ण नाशिक सजलेले असून सर्व मंदिरात, मुख्य रस्त्यांवर, सार्वजनिक परिसरात, प्रत्येक घराघरात साफसफाई झालेली आहे. समाजाच्या प्रति आपल्या कर्तव्याची जाण ठेवत युवक राष्ट्रवादी शहरातील प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई केल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.