इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्याः अयोध्या येथे होणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक गावात वेगवेगले उपक्रम घेतले जात आहे. नगर लकोसभा मतदारसंघातही भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी आपल्या मतदार संघात साखर आणि डाळ तब्बल सहाशे गावांपर्यंत पोहचवली आहे. उद्या साखर आणि डाळीतून लाडू तयार करून प्रत्येकी दोन लाडू गावातील मंदिरात प्रसाद म्हणून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यातून २१ लाख लाडू प्रसाद तयार होईल, असा त्यांनी दावा केला आहे.
लोसभा मतदार संघात चार किलो साखर, एक किलो डाळ मोफत वाटली गेली आहे. साडेसहा लाख कुपनधारकांना दोन हजार सहाशे टन साखर ६५ हजार टन डाळ वाटप करण्यात आली. नगर लोकसभा मतदारसंघात नगर शहरासह आठ तालुके येतात. त्यात ९०७ गावे आहेत. या मतदारसंघात साडेसहा लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांच्यापर्यंत विखे यांची साखर आणि डाळ घेऊन पोहोचली आहे.
खासदार विखे यांनी साखर आणि डाळ वाटप करताना लाभार्थीना प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रसाद म्हणून दोन लाडू धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून ठेवण्याचे आवाहन केले आहे. या धार्मिक उपक्रमातून २१ लाख लाडूंचा प्रसाद दाखवला जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.